कृषी अधिकारी प्रशांत शेंडेंचा राज्य शासनाकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:12+5:302020-12-28T04:12:12+5:30
देशभर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल विशेषता फळे व भाजीपाला विक्रीबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ...

कृषी अधिकारी प्रशांत शेंडेंचा राज्य शासनाकडून सन्मान
देशभर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल विशेषता फळे व भाजीपाला विक्रीबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये याकरिता कृषी अधिकारी शेंडे यांनी छोट्या-मोठ्या शहरांत शेतमाल विक्री करणाऱ्या कृषी कंपन्यांशी संपर्क साधला. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमालाची या कंपन्यांना विक्री केली. त्यामुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळले. तसेच नाफेडच्या हमीभावाने कांदा खरेदीच्या प्रक्रियेचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला. तालुक्यात अंदाजे तीन हजार टन कांदा या माध्यमातून खरेदी झाला. शेंडे यांनी शेतकरी बांधवांसाठी केलेल्या या कार्याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डाॅ. सुधीर तांबे यांनी त्यांचे कौतुक केले.
---------
फोटो नेम : २७१२२०२० प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर