निमोण ग्रामपंचायतचे कृषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:26+5:302020-12-15T04:36:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ग्रामपंचायतने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास समर्थन ...

Agriculture of Nimon Gram Panchayat | निमोण ग्रामपंचायतचे कृषी

निमोण ग्रामपंचायतचे कृषी

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ग्रामपंचायतने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास समर्थन दिले आहे. तशा आशयाचा ठराव देखील निमोण ग्रामपंचायतच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला आहे.

निमोण ग्रामपंचायतच्या नुकत्याच प्रभारी सरपंच दगडू मुरलीधर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास समर्थन देण्याचा ठराव मांडला. त्यावर मासिक सभेत चर्चा झाली. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विषयक कायदे मंजूर केलेले असून ते शेतकरी हिताचे आहेत. यावर मासिक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कृषी सुधारणा कायद्यास समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यात आला.

या ठरावाची सूचना ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी मांडली, त्यास मुश्ताक सुभेदार यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे केंद्रीय कृषी सुधारणा कायद्यास समर्थन देणारी निमोण ग्रामपंचायत नगर जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

Web Title: Agriculture of Nimon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.