इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तळेगाव दिघे मध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:43+5:302021-06-09T04:26:43+5:30

यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ केल्याने ...

Agitation in Talegaon Dighe to protest against fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तळेगाव दिघे मध्ये आंदोलन

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तळेगाव दिघे मध्ये आंदोलन

यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ केल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, माजी उपसरपंच बाळासाहेब दिघे, गणेश दिघे, संपतराव दिघे, रावसाहेब दिघे, अमोल दिघे, निलेश दिघे, कचरू वांरुक्षे, भाऊसाहेब दिघे, काशिनाथ जगताप, अक्षय दिघे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंडलाधिकारी श्री. नांदुरकर यांना आंदोलकांनी मागणीचे निवेदन दिले. प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. सानप, पोलीस नाईक बाबा खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, पोलीस नाईक श्री. पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता. सदर आंदोलन शांततेत पार पडले.

-----------

फोटो : तळेगाव दिघे :

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन प्रसंगी मागणीचे निवेदन देताना सरपंच बाबासाहेब कांदळकर सहित पदाधिकारी.

Web Title: Agitation in Talegaon Dighe to protest against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.