चोरट्यांशी झालेल्या झटापटीत वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 15:12 IST2017-08-25T15:12:51+5:302017-08-25T15:12:51+5:30
शेवगाव : चोरट्यांशी झालेल्या झटापटीत जयश्री उर्फ गंगूबाई भाऊसाहेब ठाणगे या ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.

चोरट्यांशी झालेल्या झटापटीत वृद्धेचा मृत्यू
श वगाव : चोरट्यांशी झालेल्या झटापटीत जयश्री उर्फ गंगूबाई भाऊसाहेब ठाणगे या ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शेवगाव शहरातील गजबजलेल्या टिळक चौकातील भांडाईत गल्लीत हा प्रकार घडला. या घटनेमुळे शेवगाव शहर व तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच जयश्री यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.