अगस्तीच्या हिताला बाधा आणल्यास गप्प बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:40+5:302021-07-23T04:14:40+5:30

सावंत म्हणाले, तालुक्यातील सहकारी व एज्युकेशन सोसायटीचा आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर येत असून, तालुकाच भ्रष्टाचाराने बुडविला. कारखान्यात झालेल्या चोरीच्या पाठीमागे ...

Agastya's interests will not be compromised | अगस्तीच्या हिताला बाधा आणल्यास गप्प बसणार नाही

अगस्तीच्या हिताला बाधा आणल्यास गप्प बसणार नाही

सावंत म्हणाले, तालुक्यातील सहकारी व एज्युकेशन सोसायटीचा आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर येत असून, तालुकाच भ्रष्टाचाराने बुडविला. कारखान्यात झालेल्या चोरीच्या पाठीमागे कोण आहे? पोलिसांत तक्रार दाखल का केली नाही? सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून व्यवस्थापनाच्या सहभागाने चोरी होते की काय ?

नवले म्हणाले, कर्जामुळे डबघाईस चाललेला कारखाना वाचविण्याची शेवटची संधी असून, संचालक मंडळ, व्यवस्थापन, कामगार, ऊस उत्पादक समन्वय समिती यांची बैठक घेऊन कारखाना चालविण्यासाठीचे धोरण ठरवावे. संवादाची दारे बंद करू नये. वेळीच सावध होऊन उधळपट्टी थांबली जावी. चालू वर्षाचा हंगाम सुरळीत सुरू व्हावा. देणे कर्ज बाकी देण्याविषयीचे नियोजन, कामगार पगार देणे, वाहतूकदार, ऊस तोडणी कामगार उचल, कारखाना क्षेत्रातील ऊसतोडणीला प्राधान्य याबाबतीत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे कबूल केले होते; मात्र अद्याप बैठक आयोजित केलेली नाही. कर्ज मिळवून देण्यासाठी समन्वय समिती व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पाठपुरावा केला. त्या कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा.

बी. जे. देशमुख म्हणाले, आम्ही गळीत हंगाम सुरू होईपर्यंत सहकार्य करणार आहोत. मात्र, कारखाना पारंपरिक पद्धतीने न चालविता त्याला उभारी मिळावी म्हणून व्यवस्थापनात अपेक्षित बदल केला जावा. उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्यात लक्ष घालणार असल्याने आम्ही सध्या शांत आहोत. त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये. कारखान्यातील चोरी प्रकरण दडपले न जाता पोलिसांत तक्रार दाखल करावी.

.............

सात ते आठ किलोंचा एक पितळी बुश स्टोअर रूमचा पञा वाकून किरकोळ चोरी झाली. याबाबत चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित वसुली कारवाई सुरू आहे.

- एकनाथ शेळके, कार्यकारी संचालक, अगस्ती साखर कारखाना

Web Title: Agastya's interests will not be compromised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.