शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतर डोक्यावरील केसांना लागली ‘कात्री’; सलून व्यवसायिकांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:03 IST

चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश उद्योग व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील दाढी, कटींग करणाºया सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने अनेकांच्या डोक्यावरील केसांना तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच कात्री लागली.

बोधेगाव : चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश उद्योग व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील दाढी, कटींग करणाºया सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने अनेकांच्या डोक्यावरील केसांना तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच कात्री लागली.शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील बालमटाकळी, चापडगाव, हातगाव, मुंगी, कांबी, लाडजळगाव आदी गावांतील उद्योगधंदे मागील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुरू करण्यात आले होते. मात्र त्यात सलून व्यवसायाचा समावेश नसल्याने खेड्यातील अनेक व्यावसायिकांना घरोघरी अथवा शेतामध्ये जाऊन दाढी-कटींगसाठी भटकावे लागले तर काहींनी व्यवसाय न करणेच पसंद केले होते. यामुळे हातावर पोट असणाºया व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, सध्या सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने बोधेगावसह परिसरात शुक्रवारी (दि.२२) सकाळी नऊ वाजताच दुकाने उघडण्यात आली. नव्या आदेशानुसार दुकाने उघडता येणार असल्याचे समजल्यावर अनेकांनी आदल्या दिवशीच दुकानातील धूळ झटकून साफसफाई केली होती. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश व नवीन रूमाल, फेसवॉश आदी साहित्य उपलब्ध करून ठेवल्याचे दिसून आले. ग्राहकांची दाढी-कटींग करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गर्दी न करता खबरदारी घेतली जात आहे. माझे सलून दुकान जवळपास दोन महिन्यांपासून बंद होते. लॉकडाऊन काळात नेहमीच्या ओळखीतील काहींच्या दाढी-कटींगसाठी घरी किंवा शेतामध्ये जाऊन उन्हातान्हात भटकावे लागले. परंतु, सध्या सलून दुकाने उघडल्याने रोजीरोटीचा प्रश्न मिटला असून भटकंतीही थांबली आहे, असे बोधेगाव येथील सलून व्यावसायिक मच्छिंद्र वाघमारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShevgaonशेवगाव