शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांनंतर शहर बँकेतील अपहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

अपहारातील मुख्य सूत्रधार डॉ. नीलेश विश्वास शेळके याच्याविरोधात प्रथम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानंतर उर्वरित ...

अपहारातील मुख्य सूत्रधार डॉ. नीलेश विश्वास शेळके याच्याविरोधात प्रथम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानंतर उर्वरित आरोपींविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.

नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनिरी खरेदीसाठी डॉ. नीलेश शेळके याने बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक केली, अशा प्रकारची फिर्याद राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१८ मध्ये दाखल केली होती. या तिघांची प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार डॉ. शळके याच्यासह बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व मशिनरी वितरकांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर उपअधीक्षक सोनवणे यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

----------------------------------

दोन गुन्ह्यात २५, तर एका गुन्ह्यात २२ आरोपी

बोगस कर्जवाटपप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोन दोषारोपपत्रात डॉ. शेळके याच्यासह २५ जणांची नावे नमूद आहेत, तर तिसऱ्या दोषारोपपत्रात २२ आरोपींची नावे नमूद आहेत. शेळके याच्याव्यतिरिक्त इतर कुणावर सध्या दोष ठेवण्यात आलेला नाही. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये पैशांचे हस्तांतरण कुणाकडून कसे झाले, त्याला जबाबदार कोण होते, हे समोर आल्यानंतर पुराव्यांच्या आधारे इतरांविरोधात दोषारोपत्र दाखल केले जाणार असल्याचे दाखल दोषारोपपत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

-----------------------------------

हप्त्याचे पत्र आल्यानंतर अपहार उघड

फिर्याद देणाऱ्या तीनही डॉक्टरांना त्यांच्या नावाने बँकेने कर्ज मंजूर केल्याचे माहीतच नव्हते. अचानक कर्जाचे हप्ते भरण्याबाबत पत्र आल्यानंतर, आपल्या नावाने बोगस कर्ज उचलून फसवणूक करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

----------------------------

फॉरेन्सिक ऑडिटमध्येच अडकलाय तपास

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शोधत असताना एलसीबी पथकाला फरार डॉ. शेळके २६ डिसेंबर २०२० रोजी पुणे येथे मिळून आला. त्यानंतर त्याला आर्थिक गुन्हे शाखेने वर्ग करून घेतले. या गुन्ह्याचे तब्बल दीड वर्षापासून फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून त्या अहवालानंतरच तपास पूर्ण होईल, असे तपासी अधिकारी यांचे म्हणणे आहे. डॉ. शेळके याच्याविरोधात फॉरेन्सिक ऑडिटशिवाय दोषारोपपत्र दाखल झाले, तसे इतर आरोपींविरोधात का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शेळकेव्यतिरिक्त या गुन्ह्यात एकाही आरोपीला अटक केलेली नाही.