कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 17:22 IST2019-02-17T17:22:41+5:302019-02-17T17:22:56+5:30
येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे.

कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर...
श्रीगोंदा : येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे. त्यामुळे शासन काय भूमिका घेते महत्त्वाचे ठरणार आहे.
कुकडी कालवा सल्लागार समितीची १५ फेब्रुवारी दरम्यान बैठक होणार होती पण धरणातील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेचा विचार घेऊन बैठकही लांबणीवर पडली आहे. कुकडी प्रकल्पात ८ हजार ७६ दशलक्षघनफुट (२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये येडगाव ४७ टक्के, माणिकडोह १२ टक्के, वडज २५ टक्के, डिंभे ३७ टक्के, पिंपळगाव जोगे २५ टक्के अशी परिस्थिती आहे. पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉक मधून २ दशघनमीटर पाणी घेतल्याशिवाय येडगावमधून आवर्तन सोडतात येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा संपल्यानंतर पिंपळगावचे येडगावकडे झेपावणार आहे.
कुकडीतून एकच आवर्तन
कुकडीतून एक आवर्तन देता येऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पदाधिकारी शेतक-यांच्या फळबागांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. फळबागांना पाणी दिले तर वाड्या-वस्तीवर राहणा-या ५० टक्के लोकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो ही वस्तुस्थिती आहे.