शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेडगावनंतर चांडगावातही कॅफेनयुक्त शीतपेयांवर बंदी, ग्रामपंचायतीचा ठराव; पालकांमधून निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 23:44 IST

अठरा वर्षांखालील व्यक्तींना असे कॅफेनयुक्त शीतपेय देण्यास बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी ग्रामपंचायतीने विक्रीवर बंदी आणणारा ठराव मंजूर केला आहे.

आढळगाव (जि. अहिल्यानगर) : कॅफेनयुक्त शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक घेण्याची झिंक ग्रामीण भागातील शाळकरी मुलांमध्ये वाढत आहे. हा धोका लक्षात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव व चांडगावातील ग्रामपंचायतनेही ठराव करुन या शीतपेयांच्या गावातील विक्रीवर बंदी घातली आहे.अठरा वर्षांखालील व्यक्तींना असे कॅफेनयुक्त शीतपेय देण्यास बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी ग्रामपंचायतीने विक्रीवर बंदी आणणारा ठराव मंजूर केला आहे. कॅफेनयुक्त शीतपेय आणि तस्सम पेयांकडे ग्रामीण भागातील शाळकरी मुलांचा कल वाढत आहे. गावामध्येच सहजासहजी मिळणाऱ्या या शीतपेयांच्या पार्ट्यांची चर्चा किशोरवयीन मुलांच्या वाढदिवसांनाही होऊ लागल्या आहेत. शाळकरी मुलांच्या हाती या शीतपेयांच्या बाटल्या पाहून सुजाण पालकांना याचा धोका वाटत होता. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील मुलांमध्ये या ड्रिंकची क्रेझ वाढत चालली आहे. पालकांच्या चिंतेची दखल घेऊन तालुक्यातील चांडगाव येथील सरपंच मनिषा म्हस्के यांनी पुढाकार घेत कॅफेनयुक्त शीतपेय, एनर्जी ड्रिंकवर बंदीचा ठराव केला. गावातील विक्रेत्यांना विश्वासात घेऊन शाळकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून गावाच्या हितासाठी अशा शीतपेयांची विक्री बंद करण्याचे आवाहन केले आहे.तालुक्यातील पेडगाव येथे एका शाळकरी विद्यार्थ्याचा जीव अशा शीतपेयामुळे गेल्याची चर्चा झाल्यानंतर या पेयांवर बंदी घालण्याचा ठराव घेणारे पेडगाव हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले. येथील सरपंच इरफान पिरजादे यांनी पुढाकार घेऊन बंदीचा ठराव केला होता.शाळकरी मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि हीच मुले या कॅफेनयुक्त शीतपेयांच्या आहारी जात असल्याचे चित्र लक्षात घेऊन या शीतपेयांची विक्री बंदीचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.-मनिषा म्हस्के, सरपंच. ग्रामपंचायत चांडगाव.

मोठ्या गावांनी पुढाकार घेण्याची गरजकॅफेनयुक्त शीतपेयांचा आग्रह हा व्यसनाधीनतेकडे वाटचाल होण्याचा धोका आहे त्यामुळे आढळगाव, हिरडगाव, शेडगावसारख्या मोठ्या गावांनीही बंदीचा निर्णय घेण्याची गरज पालकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतStudentविद्यार्थी