महिनाभरानंतर नगरमध्ये पुन्हा एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 09:06 IST2020-05-12T09:05:54+5:302020-05-12T09:06:26+5:30

नगर शहरात गेल्या महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नसताना आज सकाळी आलेल्या अहवालात नगरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

After a month in the town again a positive | महिनाभरानंतर नगरमध्ये पुन्हा एक पॉझिटिव्ह

महिनाभरानंतर नगरमध्ये पुन्हा एक पॉझिटिव्ह

 अहमदनगर : नगर शहरात गेल्या महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नसताना आज सकाळी आलेल्या अहवालात नगरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
 आतापर्यंत जिल्ह्यात 53 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण जामखेड व संगमनेरमध्ये आढळले आहेत. नगर शहरात प्रारंभीच्या काळात 9 रुग्ण आढळले होते. परंतु ते सर्वजण बरे होऊन घरी पोहोचले. गेल्या महिन्यापासून शहरात एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरात दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालामध्ये नगर शहरातील एक महिला पॉझिटिव्ह आढळली.   या महिलेमध्ये सारीची लक्षणे आढळल्याने तिचा नमुना  तपासणीसाठी पाठविण्यात आला  होता.

Web Title: After a month in the town again a positive