महिनाभरानंतरही आरोपी मोकाटच
By Admin | Updated: October 4, 2016 00:45 IST2016-10-04T00:17:15+5:302016-10-04T00:45:03+5:30
कर्जत : मुख्य आरोपी केतन भाऊसाहेब लाढाणे व त्याला मदत करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बाभूळगाव खालसा येथील पुराणे कुटुंबियांनी सोमवारी कर्जतच्या

महिनाभरानंतरही आरोपी मोकाटच
कर्जत : मुख्य आरोपी केतन भाऊसाहेब लाढाणे व त्याला मदत करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बाभूळगाव खालसा येथील पुराणे कुटुंबियांनी सोमवारी कर्जतच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणात लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तीही सहभागी आहेत.
बाभूळगाव खालसा येथील पोपट मारूती पुराणे यांच्या मुलीची गावातील केतन लाढाणे छेडछाड करीत होता. या प्रकारास कंटाळून तिचे वडील पोपट पुराणे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मुख्य आरोपी लाढाणेसह पाच जणांविरूद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र मुख्य आरोपीला कर्जत पोलिसांनी अजून अटक केली नाही. तसेच पोलिसांनी गांभीर्याने हे प्रकरण न हाताळल्याने अटकेतील चार आरोपी जामिनावर सुटल्याचा पुराणे कुटुंबियांचा आरोप आहे. आत्महत्येस एक महिना झाला तरी देखील मुख्य आरोपीस कर्जत पोलीस अटक करू शकले नाहीत. फिर्याद मागे घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याने पुराणे कुटुंबीयांना दहशतीचा सामना करावा लागतो. मुख्य आरोपीस फरार राहण्यासाठी मदत करणारे तुकाराम व छाया लंघे, ज्ञानेश्वर पुराणे यांना अटक करण्याची मागणी मयताची पत्नी जाई पुराणे यांनी केली आहे. आरोपी मोकाट असल्यामुळे लहान मुलांना दहशतीखालीच शाळेत जावे लागते.
उपोषणार्र्थींची उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेट घेऊन मुख्य आरोपी व त्याला मदत करणारांवर कडक कारवाई करण्याची तसेच जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत या कुटूंबाला पोलीस संरक्षण पुरविण्याची ग्वाही पुराणे कुटुंबियांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे हजर होते. मुंडे यांच्या भेटीनंतरही पुराणे कुटुंबियांनी उपोषण सुरू ठेवले आहे. यात निलेश पुराणे,जाई पुराणे,निकिता पुराणे, दत्तू पुराणे,राणी पुराणे,डॉ. दिगंबर पुराणे, गणेश तोरडमल आदी सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
उपोषणार्र्थींची उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेट घेऊन मुख्य आरोपी व त्याला मदत करणारांवर कडक कारवाई करण्याची तसेच जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत या कुटूंबाला पोलीस संरक्षण पुरविण्याची ग्वाही पुराणे कुटुंबियांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे हजर होते. मुंडे यांच्या भेटीनंतरही पुराणे कुटुंबियांनी उपोषण सुरू ठेवले आहे. यात निलेश पुराणे,जाई पुराणे,निकिता पुराणे, दत्तू पुराणे,राणी पुराणे,डॉ. दिगंबर पुराणे, गणेश तोरडमल आदी सहभागी झाले आहेत.