दारू प्राशन केली अन् मित्रालाच धाडले यमसदनी, सावेडीत तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 20:45 IST2020-05-31T20:45:45+5:302020-05-31T20:45:53+5:30
अहमदनगर-नगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील गजराज फॅक्टरीच्या समोर अमोल थोरात या व्यक्तीचा दगड व धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

दारू प्राशन केली अन् मित्रालाच धाडले यमसदनी, सावेडीत तरुणाची हत्या
अहमदनगर-नगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील गजराज फॅक्टरीच्या समोर अमोल थोरात या व्यक्तीचा दगड व धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
थोरात व त्याचा मित्र हे आज रविवारी सायंकाळी दारू पिण्यासाठी बसले होते. दारूची झिंग चढल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पर्यावसन भांडनात झाले. त्यातूनच मित्रानेच आपल्या मित्रास यमसदनी पाठवले. तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.