ॲड. कोठारी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:23+5:302020-12-09T04:16:23+5:30

कोपरगाव : मोटार अपघाताचे बनावट कागदपत्रे तयार करून दि.२२ फेब्रुवारी २००० रोजी खोटा दावा दाखल करून कोपरगाव न्यायालयाची व ...

Adv. Kothari remanded in police custody for one day | ॲड. कोठारी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

ॲड. कोठारी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

कोपरगाव : मोटार अपघाताचे बनावट कागदपत्रे तयार करून दि.२२ फेब्रुवारी २००० रोजी खोटा दावा दाखल करून कोपरगाव न्यायालयाची व विमा कंपनीची फसवणूक केली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०२० रोजी ॲड. मंगला राजेश कोठारी (रा. श्रीरंग अपार्टमेंट गुज्जर गल्ली, अ. नगर) यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात ॲड. कोठारी यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव न्यायालयाने शुक्रवारी (दि.४ डिसेंबर) फेटाळून पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ॲड. मंगला कोठारी या मंगळवारी (दि.८) कोपरगाव शहर पोलिसांसमोर हजर झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना अटक करून कोपरगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने कोठारी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Adv. Kothari remanded in police custody for one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.