नागरदेवळे येथील युवकांचा आरपीआयमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:53+5:302021-09-14T04:25:53+5:30

अहमदनगर: नागरदेवळे येथील युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षात नुकताच प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी युवकांनी ...

Admission of youth from Nagardevale in RPI | नागरदेवळे येथील युवकांचा आरपीआयमध्ये प्रवेश

नागरदेवळे येथील युवकांचा आरपीआयमध्ये प्रवेश

अहमदनगर: नागरदेवळे येथील युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षात नुकताच प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी युवकांनी काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी जाहीर प्रवेश केला. आरपीआय आय.टी. सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, पँथर ग्रुपचे अध्यक्ष आकाश जाधव, भिंगार अर्बन बँकेचे संचालक एकनाथ जाधव, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य मयूर पाखरे, आकाश बडेकर, दया गजभिये, आशिष भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, प्रवीण वाघमारे, निखिल सुर्यवंशी, नितीन निकाळजे, गौतम कांबळे, विक्रम चव्हाण, विशाल कदम, अक्षय गायकवाड, मिथुन दामले, बापू भोसले, धनंजय पाखरे, बाबासाहेब बनसोडे, कुणाल घाटविसावे, शाहुल साळवे, कृष्णा धावडे, प्रकाश धावडे, करण थोरात आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन अजय पाखरे, दिलीप टेमकर, मंगल पाखरे, मंगल जाधव यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी तुषार धावडे यांची आरपीआय सोशल मीडिया आय.टी. सेल नगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

...

सूचना: फोटो १३ आरपीआय नावाने आहे.

Web Title: Admission of youth from Nagardevale in RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.