बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू
By | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:02+5:302020-12-09T04:17:02+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षणालयाच्या वतीने प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी ८ डिसेंबरपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू ...

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू
अहमदनगर : महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षणालयाच्या वतीने प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी ८ डिसेंबरपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, तर त्यांनी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज व ओरिजनल स्कॅन केलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने संचालनालयाने नियुक्त केलेल्या ई स्क्रुटिनी सेंटरमार्फत होणार आहे. २०२०-२१ या वर्षासाठी रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ७ डिसेंबरच्या पत्रकानुसार संचालनालयाने ई स्क्रुटिनी सेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महाविद्यालयाने नगर शहरातील गुरुगणेश कॉम्प्लेक्स, मार्केट यार्ड रोड, चंदुकाका सराफ इमारतीच्या मागे कार्यालयात विद्यार्थ्यांकरिता डॉक्युमेंट स्कॅनिंग, ऑनलाइन फॉर्म फिलिंग, तसेच मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती रमेश फिरोदिया ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सी.ए. रमेश फिरोदिया व सल्लागार विश्वस्त डॉ. शरद कोलते यांनी केले आहे. (वा. प्र.)