कोविड सेंटरच्या मदतीला प्रशासकीय अधिकारी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:25+5:302021-04-22T04:21:25+5:30
कर्जत : कोविड सेंटरच्या मदतीला येथील प्रशासकीय अधिकारी सरसावले आहेत. सात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रांत कार्यालय, ...

कोविड सेंटरच्या मदतीला प्रशासकीय अधिकारी सरसावले
कर्जत : कोविड सेंटरच्या मदतीला येथील प्रशासकीय अधिकारी सरसावले आहेत. सात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रांत कार्यालय, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस निरीक्षक कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, नगरपंचायत कार्यालय या आस्थापनांच्यावतीने येथील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून प्रत्येक विभागाकडून प्रत्येकी एक ऑक्सिजन कंटेनर व मशीन उपजिल्हा रुग्णालयास भेट देण्यात आले. हे कंटेनर मशीन उपजिल्हा रुग्णालय यांच्या ताब्यात दिले आहेत. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर उपस्थित होते.
--
२१ कर्जत कोविड
कर्जतच्या उप जिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले.