प्रशासन बुजविणार खड्डे

By Admin | Updated: July 25, 2016 00:05 IST2016-07-24T23:45:05+5:302016-07-25T00:05:10+5:30

अहमदनगर : पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली निविदा मंजूर होवूनही ठेकेदाराने नकार दिल्याने फेरनिविदा काढण्यास प्रभारी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

Administration will bury the pits | प्रशासन बुजविणार खड्डे

प्रशासन बुजविणार खड्डे

अहमदनगर : पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली निविदा मंजूर होवूनही ठेकेदाराने नकार दिल्याने फेरनिविदा काढण्यास प्रभारी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मात्र ही निविदा प्रक्रिया राबविण्याचा कालावधी लांबण्याची शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनानेच खड्डे बुजविण्याचे आदेश महापौर सुरेखा कदम यांनी दिले आहेत.
शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. एकीकडे पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे खड्ड्यांची व्याप्ती वाढत आहे. छोटे खड्डे हे मोठे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून जाणे महापालिकेला अडचणीचे ठरत आहे. खड्डे बुजविण्यासाठीचा वार्षिक ठेका देण्यासाठी जूनमध्येच प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली होती. ए. सी. कोठारी यांची निविदा मंजूरही झाली होती. ठेकेदाराने वाढीव दराची केलेली मागणी आयुक्तांनी नाकारल्याने ठेकेदाराने खड्डे बुजविण्यास नकार दिला. त्यामुळे फेरनिविदा काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
फेरनिविदा काढण्यास प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांनी मंजुरी दिली आहे. दोन दिवस सुट्ट्या असल्याने फेरनिविदा सोमवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया राबविण्याचा कालावधी मोठा असल्याने तोपर्यंत नागरिकांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, खड्डेच खड्डे चोहीकडे, असे वृत्त रविवारी ‘लोकमत’ने सचित्र प्रसिद्ध केले होते. त्याची दखल महापौर कदम यांनी घेतली असून खड्डे बुजविण्याचे आदेशच त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दुसरीकडे वार्षिक ठेका देण्यासाठी फेरनिविदा प्रसिद्ध होणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Administration will bury the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.