कोविड सेंटरला प्रशासनाने आवश्यक मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:16+5:302021-06-06T04:16:16+5:30
समशेरपूर या ठिकाणी १० ऑक्सिजनच्या बेडसह एकूण १०० बेडचे कोविड सेंटर सुरु आहे. कोविड सेंटरमधून आजपर्यंत ३९५ रुग्ण ...

कोविड सेंटरला प्रशासनाने आवश्यक मदत करावी
समशेरपूर या ठिकाणी १० ऑक्सिजनच्या बेडसह एकूण १०० बेडचे कोविड सेंटर सुरु आहे. कोविड सेंटरमधून आजपर्यंत ३९५ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले आहेत, परंतु केळी रुम्हणवाडी, (ता. अकोले) या ठिकाणी असलेल्या शासकीय आश्रमशाळेत कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. हे कोविड सेंटर ५ दिवसच सुरु होते. या कालावधीत या ठिकाणी फक्त आठ रुग्ण दाखल झाले होते. हे ही रुग्ण नंतर समशेरपूर येथील कोविड सेंटरमध्ये वर्ग करण्यात आले होते. समशेरपूर या ठिकाणी मधुकर पिचड आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरु केले आहे. सध्या कोविडच्या महामारीमध्ये कोणाच्याही हाताला कामे नाहीत, लोक हतबल झालेले आहेत. कोविड संसर्ग झालेले लोक उपचारासाठी या कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. अशातच या कोविड सेंटरला तालुका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा सहकार्य होत नाही. या कोविड सेंटरला तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केलेली आहे. यामध्ये औषध पुरवठा, अल्पोपहार, चहा, बिस्कीट, अंडी इत्यादी सर्व सुविधा या आलेल्या मदतीतूनच करण्यात आलेल्या आहेत. केंद्रास मधुकरराव पिचड यांचे नाव देण्यात आल्यामुळे तालुका प्रशासनाने या कोविड सेंटरकडे फक्त राजकारण म्हणून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यात केला आहे. या कोविड सेंटरला एकवेळ फक्त तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट दिली आहे. या व्यतिरिक्त कुणीही या कोविड सेंटरला भेटी दिल्या नाहीत. तालुका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही. हा दुजाभाव कशासाठी?
तहसीलदार यांनी केळी रुम्हणवाडी येथील बंद पडलेल्या कोविड सेंटरला आयडीनंबर देण्यात आलेला आहे. तालुका प्रशासनाकडून योग्य ती मदत व सहकार्य करण्यासाठी आपल्या स्तरावरुन संबंधितांना सूचित करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.