वन महोत्सवासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: July 1, 2016 00:31 IST2016-07-01T00:12:30+5:302016-07-01T00:31:35+5:30
अहमदनगर : कृषी दिन आणि वन महोत्सवाचे औचित्य साधून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचा भाग म्हणून नगर जिल्ह्यात शुक्रवारी

वन महोत्सवासाठी प्रशासन सज्ज
अहमदनगर : कृषी दिन आणि वन महोत्सवाचे औचित्य साधून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचा भाग म्हणून नगर जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी १९ लाख ६८ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कारखाने, मिलिट्री, आरोग्य विभाग यासह नागरिक सज्ज झाले असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने देण्यात आली. शासकीय यंत्रणेसह, नागरिक वृक्ष लागवड करतांना एवढा उत्साह दाखवत आहेत. त्यांनी वृक्ष संवर्धनातही तो उत्साह दाखवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास, तापमानातील चढउतार, घटलेला व बेभरवशाचा पाऊस, वाढलेले हरित वायूंचे प्रमाण याला वृक्ष आच्छादानात झालेली चिंताजनक घट हेच मुख्य कारण आहे. राज्यात एकाच दिवशी १ जुलैला २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात १९ हजार ६८ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे ४ लाख ६० हजार, वन विभागाकडे १६ लाख ६४ हजार रोपे तयार आहेत.
(प्रतिनिधी)