कोपरगावात गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:52+5:302021-09-19T04:21:52+5:30

कोपरगाव : शहरातील घरघुती गणपती बापाच्या रविवारी (दि.१९) होणाऱ्या विसर्जनासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोदावरी ...

Administration ready for Ganesh immersion in Kopargaon! | कोपरगावात गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज !

कोपरगावात गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज !

कोपरगाव : शहरातील घरघुती गणपती बापाच्या रविवारी (दि.१९) होणाऱ्या विसर्जनासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनाप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर आणण्यापूर्वी घरीच आरती करावी. त्यानंतर संकलन केंद्रावरच मूर्तीचे विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निर्माल्य हे आपल्याच घर परिसरातील झाडांना, कुंड्यांना टाकावे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येईल. छोटा पूल घाट बाजू, गोदावरी पेट्रोलपंपासमोर, पोलीस स्टेशनजवळ (चर्च), शनिमंदिर (टिळकनगर कॉर्नर), छत्रपती संभाजी महाराज सर्कल, माधव उद्यान, साईबाबा तपोभूमी या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र असणार आहेत.

Web Title: Administration ready for Ganesh immersion in Kopargaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.