धोकादायक इमारतीऐवजी जिल्ह्यातील शाळांना पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 20:06 IST2017-08-29T19:59:06+5:302017-08-29T20:06:56+5:30

अहमदनगर : शाळेच्या इमारतीबात सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण कालच प्रशासनाला दिले  आहेत. या बांधकामाचीही चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या प्रसंगी दिला

Administration order to make alternate school instead of dangerous buildings | धोकादायक इमारतीऐवजी जिल्ह्यातील शाळांना पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश

धोकादायक इमारतीऐवजी जिल्ह्यातील शाळांना पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखेंच्या सूचना निंबोडीतील मृतांच्या नातेवाईकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : शाळेच्या इमारतीबात सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण कालच प्रशासनाला दिले  आहेत. या बांधकामाचीही चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक करणार असून  जिल्ह्यातील नादुरुस्त असलेल्या खोल्या आणि इमारतींमध्ये शाळा न भरवता विद्यार्थ्यांची पर्यायी  व्यवस्था करण्याचा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आज निंबोडी येथे जिल्हा परिषदेच्या वर्ग खोलीचे छत कोसळून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी भेट घेवून त्यांना दिलासा दिला. ही घटना अतिशय दुर्दवी असून आम्ही तुमच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी परिवाराला सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेश परजणे, शिवाजीराव गाढे, प्रतापराव शेळके यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

 आज विखे यांनी उपचार करणा-या डॉक्टरांशी चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना शासन मदत मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षा विखे पाटील यांनी आधिका-यांची तातडीने बैठक घेवून, जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींबाबत असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. नादुरुस्त असलेल्या खोल्या आणि इमारतींमध्ये शाळा न भरवता विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शाळा खोल्यांच्या संदर्भात शासनाकडुन निधी मिळावा यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत. शिर्डी संस्थानकडे शाळा खोल्या बांधण्यासाठी निधीची मागणी यापुर्वीच केली असल्याचेही विखे यांनी सांगितले.


 


 

Web Title: Administration order to make alternate school instead of dangerous buildings