आदित्य ठाकरे साईदरबारी

By Admin | Updated: June 23, 2014 00:09 IST2014-06-22T23:35:41+5:302014-06-23T00:09:25+5:30

सेनेचे शिर्डीत मध्यवर्ती कार्यालय : चांगली कामे होवोत, सार्इंना साकडे

Aditya Thakre Saidebari | आदित्य ठाकरे साईदरबारी

आदित्य ठाकरे साईदरबारी

शिर्डी : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रविवारी आई रश्मी ठाकरे यांच्या समवेत साईदरबारी हजेरी लावत साईंना केंद्रातील एनडीए सरकार व राज्यातील आगामी युती सरकारच्या माध्यमातून चांगली कामे होवोत यासाठी साकडे घातले़
दुपारी तीनच्या सुमारास तब्बल दोन तास उशिरा आलेल्या अदित्य ठाकरे यांनी आपली आई रश्मी ठाकरे यांच्यासह साईसमाधीचे दर्शन घेतले़ साईदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, शिर्डी, नाशिक तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सत्याचा व धर्माचा विजय झाला़़ देशभरात एनडीएची लाट आली. त्यामुळे एक चांगलं सरकारही तयार झालं. आता आमच्या हातून चांगले काम घडो हीच प्रार्थना करायला आलो आहे, राज्यातही महायुतीची सत्ता येणार आहे, येथेही चांगले काम होवो, यासाठी बाबांचा आशीर्वाद मागितला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेंवरे, तालुकाप्रमुख कमलाकर कोते, अभय शेळके, शहरप्रमुख सचिन कोते, संजय शिंदे, राजेंद्र पठारे, राहुल गोंदकर आदींसह शेकडो शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते़ साईदर्शनानंतर संस्थानच्या वतीने ठाकरे मायलेकांचा सत्कार करण्यात आला़ यानंतर आदित्य ठाकरे यांनी रोड शो ने जात खासदार लोखंडे यांच्या शिर्डीतील नांदुर्खी रोडवरील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले़ यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते़

Web Title: Aditya Thakre Saidebari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.