आदिक यांना राजकीय विरोध मान्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:30+5:302021-07-05T04:14:30+5:30
याप्रकरणी पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी चित्ते यांनी रविवारी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक किरण ...

आदिक यांना राजकीय विरोध मान्य नाही
याप्रकरणी पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी चित्ते यांनी रविवारी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक किरण लुणिया, अरुण पाटील, डॉ. दिलीप शिरसाठ, प्रवीण पैठणकर, सरपंच महेंद्र साळवी, बाबासाहेब शिंदे, सुदर्शन शितोळे, मनोज हिवराळे, संजय पांडे, अभिजित कुलकर्णी उपस्थित होते.
चित्ते म्हणाले, आपल्याविरुद्ध न्यायालयीन दावा प्रलंबित असला तरी आंदोलनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. हा प्रश्न सुटेपर्यंत लढाई सुरूच राहील. मात्र, नगराध्यक्षा आदिक यांची आपण मानहानी केलेली नाही. संपूर्ण आंदोलनादरम्यान अनुचित भाषेचा वापर केलेला नाही. त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहे. केवळ आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा त्यांचा या दाव्यामागील हेतू आहे.
तालुक्यात यापूर्वी दिवंगत नेते गोविंदराव आदिक व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. एकमेकांविरुद्ध तिखट भाषा वापरली गेली. मात्र, अशा प्रकारे न्यायालयीन दावे कधीही करण्यात आले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याच्या मागणीसाठी पालिकेची विशेष सभा घेण्याची मागणी केली. त्यासाठी २४ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले. मात्र, नगराध्यक्षा आदिक यांनी सभेला फाटा दिला, अशी टीका चित्ते यांनी केली.
-------
विरोधकांना भीती दाखविली
हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या जमिनीची महसूल थकबाकी वसूल करावी, यासाठी काही जणांनी तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र, अब्रुनुकसानीचा दावा टाळण्यासाठी त्यांना कागदपत्रे मिळवण्यात वेळ खर्च करावा लागला, असे चित्ते यावेळी म्हणाले.
--------