अधोडी, खरडगाव शाळेला दोन वर्गखोल्या मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:31+5:302021-04-04T04:21:31+5:30
शेवगाव : तालुक्यातील लाडजळगाव गटामध्ये अधोडी, खरडगाव येथे प्रत्येकी दोन तर सुळे पिंपळगाव, मंगरुळ बुद्रुक येथे प्रत्येकी एक अशा ...

अधोडी, खरडगाव शाळेला दोन वर्गखोल्या मंजूर
शेवगाव : तालुक्यातील लाडजळगाव गटामध्ये अधोडी, खरडगाव येथे प्रत्येकी दोन तर सुळे पिंपळगाव, मंगरुळ बुद्रुक येथे प्रत्येकी एक अशा प्राथमिक शाळेसाठी वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत. याशिवाय तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान, ठाकूर निमगाव या ठिकाणी सार्वजनिक शौचालय मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी दिली. काकडे म्हणाल्या, लाडजळगाव जिल्हा परिषद गटातील गावामध्ये प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांची अनेक दिवसापासून नव्याने शाळा खोल्या बांधाव्यात, अशी मागणी होती. विद्यार्थ्यांना आता बसण्यासाठी नवीन शाळा खोल्या मंजूर झाल्याने त्यांची सोय होणार आहे. या शाळा खोल्यांच्या कामाचा लवकरात लवकर प्रारंभ करून शाळा खोल्यांचे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.