अतिरिक्त पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:02+5:302021-02-05T06:41:02+5:30

श्रीरामपूर : मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत अतिरिक्त पोलीस ...

Additional Superintendent of Police | अतिरिक्त पोलीस अधीक्षक

अतिरिक्त पोलीस अधीक्षक

श्रीरामपूर : मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात गुड माॅर्निंग संघावर त्यांनी विजय मिळविला. स्पर्धेत डॉक्टर, वकील, नगरपालिका, पत्रकार, मेडिकल असोसिएशन, पंचायत समिती, शेवगाव उपविभागीय पोलीस, नगर येथील स्थानिक गुन्हे शाखा, संगमनेर उपविभागीय पोलीस, महावितरण, बोरावके महाविद्यालय, आदी संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग संघाने आठ षटकांत ९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संघाने ते पाच षटकांत पूर्ण केले.

विजेत्या संघाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, अनिल साळवे, दादासाहेब निघुट, चंद्रकांत परदेशी, अविनाश काळे, राजेश कर्डक, नानासाहेब गांगड, प्रमोद सगळगिळे, विनोद तोरणे, जितेंद्र पाटील, विजय साळवे, दत्तात्रय साबळे, आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

-------------

Web Title: Additional Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.