चर्चेपेक्षा कृतीवर भर

By Admin | Updated: August 19, 2014 23:27 IST2014-08-19T23:03:12+5:302014-08-19T23:27:39+5:30

भाळवणी : पाण्यासंदर्भात केवळ बैठका किंवा परिषदा घेऊन निष्फळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष योजना राबवून कृतीवर आपला भर आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य सुजित झावरे यांनी केले.

Addition to action over discussion | चर्चेपेक्षा कृतीवर भर

चर्चेपेक्षा कृतीवर भर

भाळवणी : पाण्यासंदर्भात केवळ बैठका किंवा परिषदा घेऊन निष्फळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष योजना राबवून कृतीवर आपला भर आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य सुजित झावरे यांनी केले.
एक कोटी एक्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या ढवळपुरी ता.पारनेर येथील पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा झावरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सदस्य गंगाराम रोहोकले होते. झावरे म्हणाले, मी सतत कामात असणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. कामाच्या जोरावरच मागील दोन वर्षात आपण ४९ कोटी रुपयांची कामे करू शकलो. अभिमानाची बाब म्हणजे यातील ९० टक्के कामे पाण्याच्या संदर्भातील आहेत. माजी आमदार वसंतराव झावरे यांचे जनसेवेचे व्रत असेच चालू ठेवून पक्ष देईल ती जबाबदारी आपण निष्ठेने पूर्ण करू, असे झावरे म्हणाले.
यावेळी गंगाराम रोहोकले, बबनराव पवार, भागाजी गावडे, आप्पा थोरात, अरुण ठाणगे, ठकचंद रोहोकले व मान्यवर हजर होते. (वार्ताहर)

Web Title: Addition to action over discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.