शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शिलधी प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला माणुसकीची जोड; लॉकडाऊनमध्ये विविध घटकांना दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:14 IST

साईबाबांवरील श्रद्धेतून सेवाकार्य करणा-या येथील शिलधी प्रतिष्ठानने कोरोनाच्या महामारीत अनाथ, वृद्ध, डॉक्टर्स, पोलीस, नगरपंचायत, नाट्य कलाकार आदींच्या कार्याला यथाशक्ती हातभार लावून साईबाबांच्या शिकवणुकीला उजाळा दिला आहे.

शिर्डी : साईबाबांवरील श्रद्धेतून सेवाकार्य करणा-या येथील शिलधी प्रतिष्ठानने कोरोनाच्या महामारीत अनाथ, वृद्ध, डॉक्टर्स, पोलीस, नगरपंचायत, नाट्य कलाकार आदींच्या कार्याला यथाशक्ती हातभार लावून साईबाबांच्या शिकवणुकीला उजाळा दिला आहे.

   शिलधीचे संस्थापक राजेंद्र कोते व अध्यक्ष तुषार शेळके गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोरोनाच्या महामारीत त्यांच्या या सेवाकार्याना माणुसकीची जोड मिळाली. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या शिलधीने पीपीई कीटचा तुटवडा असताना एक लाख रुपये खर्चून पालघरहुन संस्थान रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी शंभर कीट आणले.    पोलीस, नगरपंचायत व माध्यम प्रतिनिधींना पंचवीस हजारांचे मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज भेट दिले. लॉकडाऊनमध्ये रक्ताचा तुटवडा असतांना साईनाथ रूग्णालयात पन्नास कार्यकर्त्यांनी रक्तदान करून माणुसकीचा वसा जपला. याच काळात येथील साई आश्रयामधील सव्वाशे मुलांना हापूस आमरसाची मेजवानी असो, गरजुंना किराणा साहित्याचे वाटप असो. संस्थान रूग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी कपड्यांसह बेबी कीटची भेट असो़ अशा आगळ्यावेगळ्या सेवाकार्यातून शिलधीच्या संवेदनशीलतेची ओळख  झाली.

     शिर्डी शहरातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी शिलधीने नगरपंचायतीला सर्वप्रथम आठ व पोलीस स्टेशनला चार आॅक्सीमीटर भेट दिले. शहरातील डॉक्टर, बँक कर्मचारी व प्रशासकीय अधिका-यांना सुरक्षेसाठी फेस शिल्ड व हॅन्ड वॉशबरोबरच नागरिकांच्या वतीने ऋतज्ञता पत्रही दिले.

अहमदनगरजवळील माऊली सेवा संस्थेला १० हजार रुपयांहून अधिक किमतीचे आवश्यक साहित्य तसेच विविध दात्यांच्या माध्यमातून २ लाख रुपयांचे आवश्यक साहित्य मिळवून दिले.  गो-शाळेला पाण्यासाठी आर्थिक मदत, गरजू कुटुंबाना होमिओपॅथी औषधांचे वाटप केले. अखिल भारतीय नाट्य महामंडळाकडे कलाकारांसाठी आर्थिक मदत पाठवली.

प्रशासनातील अधिका-यांच्या परिश्रमाची दखल घेत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून साईबाबांची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे भेट स्वरुपात दिले.

संकटात आपणच परस्परांच्या पाठिशी उभे रहायचे असते. या संकटाने खूप काही शिकविले. साईबाबांच्या सेवाकार्यातून प्रेरणा घेवून आम्ही हे छोटेसे काम करीत आहोत. प्रत्येक उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य तन-मन-धनाने सहभागी असल्यानेच हे शक्य होते.-तुषार शेळके, अध्यक्ष, शिलधी प्रतिष्ठान, शिर्डी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याshirdiशिर्डीSocialसामाजिक