रविवारी ८३ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST2021-01-18T04:19:41+5:302021-01-18T04:19:41+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी ८३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ५६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

रविवारी ८३ बाधितांची भर
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी ८३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ५६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. सध्या ९०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५ आणि अँटिजेन चाचणीत ११ रुग्णबाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर (२२), कोपरगाव (८), नगर ग्रामीण (१३), पारनेर (२), पाथर्डी (३), राहता (२), राहुरी (३), संगमनेर (९), शेवगाव (२), श्रीगोंदा (६) आणि कॅन्टोन्मेंट (३), नेवासा (१), श्रीरामपूर (६), इतर जिल्हा (३) अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७० हजार ८३३ इतकी झाली आहे, तर १०७७ जणांचा मृत्यू झाला आहे.