प्रभाती मोरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST2021-02-07T04:20:08+5:302021-02-07T04:20:08+5:30

पारनेर : तालुक्यातील विरोलीच्या सरपंच प्रभाती मोरे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्य आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान ...

Adarsh Sarpanch Award to Prabhati More | प्रभाती मोरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

प्रभाती मोरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

पारनेर : तालुक्यातील विरोलीच्या सरपंच प्रभाती मोरे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्य आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे खासदार सदाशिव लोखंडे, प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, यादवराव पावसे, राज्य सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष विक्रम भोर, अध्यक्ष भाऊ मरगळे, सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोरे यांनी जलयुक्त शिवारमध्ये साडेतेरा लाख साठवण क्षमता असलेला बंधारा पिंपळेश्वर देवस्थान जवळ बांधण्यात आला. ३० कुटुंबाना मोफत घरगुती गॅस देण्यात आला. तीर्थक्षेत्र विकास निधीमधून ५० हजार लिटरची टाकी व परिसरात सुशोभिकरण करण्यात आले. गाव ते कान्हूर पठार रस्त्याचे डांबरीकरण, गणपती पठार येथे नवीन अंगणवाडी, रमाई आवास योजना २५ घरकुल अशी कामे त्यांनी मार्गी लावली.

फोटो : ०६ पारनेर

Web Title: Adarsh Sarpanch Award to Prabhati More