दक्षता पथकाकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:25+5:302021-04-24T04:21:25+5:30
.... काँग्रेसच्या वतीने कोविड सहाय्यता केंद्र अहमदनगर : अहमदनगर शहर काँग्रेसच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी सहायता व मदत केंद्र उभारण्यात ...

दक्षता पथकाकडून कारवाई
....
काँग्रेसच्या वतीने कोविड सहाय्यता केंद्र
अहमदनगर : अहमदनगर शहर काँग्रेसच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी सहायता व मदत केंद्र उभारण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑनलाइन संवाद साधत नगर जिल्ह्यातील कोविडबाबतचा आढावा घेतला.
...
रेल्वेने येणाऱ्यांची होणार चाचणी
अहमदनगर : परराज्यातून नगर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशन येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेचे सहायक नगररचनाकार राम चारठणकर यांची नेमणूक केली आहे.
....
मदतीसाठी सामाजिक संस्था सरसावल्या
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांना मदत करण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था पुढे आल्या असून, ऑक्सिजन, दोनवेळचे जेवण, नास्ता आदींचा पुरवठा सामाजिक संस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
....