शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तिघा वाळू तस्करांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 15:50 IST

पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ 

अहमदनगर: पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ महेंद्र बाजीराव महारनोर (वय २६ रा़ डोमाळवाडी ता़ श्रीगोंदा), अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील (वय २० रा़ गांधीनगर कोपरगाव) व सुदाम उर्फ दीपक भास्कर खामकर(वय २८ रा़ मांडवे खुर्द ता़ पारनेर) या तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे़ महारनोर याच्यावर श्रीगोंदा, शिरुर या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, अजय पाटील याच्याविरोधात कोपरगाव तर खामकर याच्याविरोधात पारनेर व घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ या तिघांविरोधात एमपीडीएतंर्गत कोपरगाव, घारगाव व श्रीगोंदा पोलीस ठाण्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, दीपाली कांबळे, उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, रोशन पंडित, संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, दौलतराव जाधव, अंबादास भुसारे, राकेश मानगावकर, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉन्स्टेबल किरण जाधव, सुरज वाबळे, रोहित मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

टॅग्स :sandवाळूriverनदी