नगर शहरातील कुख्यात टोळीविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST2021-09-15T04:25:57+5:302021-09-15T04:25:57+5:30

टोळीप्रमुख आकाश भाऊसाहेब डाके (वय २५), गणेश भगवान कुऱ्हाडे (वय २३), सागर भाऊसाहेब डाके (वय २८), बाळासाहेब नाना वाघमारे ...

Action under ‘Mocca’ against the notorious gang in the city | नगर शहरातील कुख्यात टोळीविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

नगर शहरातील कुख्यात टोळीविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

टोळीप्रमुख आकाश भाऊसाहेब डाके (वय २५), गणेश भगवान कुऱ्हाडे (वय २३), सागर भाऊसाहेब डाके (वय २८), बाळासाहेब नाना वाघमारे (सर्व रा. बोल्हेगाव, अहमदनगर) व किरण सोमनाथ मातंग (वय २४ रा. हातगाव कांगणे, ता. शेवगाव) या आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरोधात तोफखाना पोलीस स्टेशनच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी नुकतीच मान्यता दिली.

या टोळीविरोधात तोफखाना, कोतवाली व एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कट करून खुनाचा प्रयत्न करणे, हाणामारी करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे, जबरी चोरी, दुखापत पोहोचविणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

----------------------------

आणखी काही टोळ्या रडारवर

नगर शहरात संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली असून येणाऱ्या काळात त्यांच्याविरोधातही मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या काळात कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Action under ‘Mocca’ against the notorious gang in the city