शनि भक्तांची पिळवणूक करणा-या तिघांवर कारवाई, आठ फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:55 IST2018-08-18T17:55:47+5:302018-08-18T17:55:52+5:30
शनि दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना ठराविक स्टॉलवरून प्रसाद व इतर साहित्या घेण्याकरीता पिळवणूक करणारे, एजंट म्हणून कार्यरत असलेल्या तिघांना सोनई पोलिसांनी अटक केली असून आठ जण फरार झाले आहेत. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनि भक्तांची पिळवणूक करणा-या तिघांवर कारवाई, आठ फरार
नेवासा : शनि दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना ठराविक स्टॉलवरून प्रसाद व इतर साहित्या घेण्याकरीता पिळवणूक करणारे, एजंट म्हणून कार्यरत असलेल्या तिघांना सोनई पोलिसांनी कारवाई केली असून आठ जण फरार झाले आहेत. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिळवणूक करणा-या एजंट प्रतिबंधक करण्यासाठी आज धडक मोहिम राबविण्यात आली. कारवाईमध्ये रोहीत फुलारी, मोहन शिंदे, सनी थोरात यांना अटक करण्यात आली आहे. तर गोरख धोत्रे, आणू कुसळकर, अर्जुन सावंत, संतोष फुलारी, नाना जगदाळे, विशाल, गोरख फुलारी, आण्णा फुलमाळी, गणेश साळुंके हे पळून गेले. १२ दुचाकीही जप्त करण्यात आल्या. भक्तांची वाहने राहुरी- शनि शिंगणापूर रस्त्यात अडवून ठराविक दुकानातूनच पूजा साहित्य घेण्यासाठी हे आरोपी भक्तांना धमकावत होते.
ही कारवाई सोनई पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, नितीन सप्तर्षी, संजय चव्हाण, विजय भिंगारदिवे, दत्ता गावडे, भगवान पालवे, विशाल थोरात, अमोल भांड, बाबा वाघमोडे, काका मोरे, आदिनाथ मुळे, सचिन ठोंबरे यांनी केली.