शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवरील गोळीबारासंदर्भात चौकशी अहवालानंतर कारवाई : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:08 IST

शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.गोळीबारात जखमी झालेल्या दोघा शेतक-यांची शिंदे यांनी सोमवारी येथील खासगी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. गेली चार ते पाच दिवस नियोजित दौरे असल्याने शेतक-यांची भेट घेता आली नाही, मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जखमींची भेट घेतली होती, असे सांगत पालकमंत्री म्हणाले, जखमी झालेले शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याने तेथील जिल्हाधिका-यांमार्फत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून धनादेश देण्यात येणार आहे. खानापूर येथील आंदोलन ही मोठी घटना होती़ जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे शेतक-यांना उसाला दर मिळणार आहे.खासगी साखर कारखाने आणि शेतक-यांमध्ये समन्वय राखने ही सरकारचीच जबाबदारी आहे. याच दृष्टिकोणातून २३ नोव्हेंबर रोजी नगर व नाशिक विभागांतील साखर कारखाने व शेतक-यांची समन्वय बैठक ठेवण्यात आलेली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. यामध्ये ऊसउत्पादकांचे प्रश्न समजून घेण्यात येणार आहेत.पालकमंत्र्यांनी भेट घेतली तेव्हा जखमी शेतकरी उद्धव मापारी यांनी आंदोलनादरम्यान शेतक-यांवर दाखल झाले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्र्यांनीही त्यांना सकारात्मक उत्तर देत काळजी घेण्याचे सांगितले. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगीता डोंगरे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेShevgaonशेवगाव