दूषित पाणीप्रकरणी कृतीपूर्ण कार्यक्रम
By Admin | Updated: May 13, 2014 01:18 IST2014-05-13T00:53:49+5:302014-05-13T01:18:39+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागात दर महिन्यांला पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळत आहेत. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली आहे.

दूषित पाणीप्रकरणी कृतीपूर्ण कार्यक्रम
अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागात दर महिन्यांला पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळत आहेत. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली आहे. पाण्याचे पाणी दूषित होऊ नयेत, यासाठी कृतीपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पाणी नुमने दूषित आढळणार्यां गावात कार्यवाहीसाठी सहा पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. दोन तालुक्यासाठी एक पथक कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यात काही महिन्यांपासून अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे पाणी नमुने दूषित आढळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचात आणि आरोग्य विभागावर सोपविण्यात आलेली आहे. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन मार्फत पिण्याची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या निष्काळीपणामुळे दूषित पाणी नमुने आढळणार्या गांवाची संख्या वाढत आहे. यामुळे सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रमुख यांची बैठक घेतली. यात कृतीपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हास्तरावर सहा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात चार कर्मचारी यांच्या समावेश राहणार असून त्यात दोन आरोग्य विभागातील तर दोन पाणी पुरवठा मिशन कर्मचार्यांचा समावेश राहणार आहे. ज्या गावातील पाणी नमुने दूषित येईल, त्या ठिकाणी पथक जावून पाणी दूषित होण्याची कारणे आणि त्या ठिकाणी करण्यात येणार्या उपाययोजना पूर्ण करून त्या ठिकाणाहून परत येणार आहे. अशा पध्दतीने हे पथक ठरवून दिलेल्या तालुक्यातील दररोज चार गावांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी दिली. (प्रतिनिधी) जिल्ह्यात आरोग्य केंद्राची आणि संस्थांच्या स्वच्छतेबाबत वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार आरोग्य केंद्र आणि संस्थांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ही स्वच्छता आणि निगा न राखणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदर्श आरोग्य संस्था अस्तित्वात आणण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची संकल्पना असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डा. संदीप सांगळे यांनी दिली.