स्वामी गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:29+5:302020-12-27T04:16:29+5:30

लॉरेन्स स्वामी (रा. भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव रोड), विक्रम गायकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहेब आढाव ...

Action against Swami Gang under Mocca | स्वामी गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई

स्वामी गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई

लॉरेन्स स्वामी (रा. भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव रोड), विक्रम गायकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहेब आढाव (दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. नगर), संदीप वाकचौरे, बाळासाहेब भिंगारदिवे (रा. दरेवाडी), अर्जुन ठुबे यांच्या विरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर रोडवरील छावणी परिषद नाका येथे २० नोव्हेंबर रोजी दरोडा टाकून आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत पैसे लुटले होते. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रथम आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी लॉरेन्स याच्या घराचा दरवाजा तोडून त्याला अटक केली होती. दरम्यान, या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींविरोधात याआधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या गँगविरोधात मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव भिंगार पोलिसांनी पाेलीस अधीक्षकांकडे पाठिवला होता.

सराईत टोळ्यांचे दणाणले धाबे

संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जात आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी संकलित करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात मोक्का, एमपीडीए व तडीपारी अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. स्वामी गँगविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याने जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Action against Swami Gang under Mocca