नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:09+5:302021-01-08T05:05:09+5:30
पोलिसांनी शहरातील झेंडीगेट येथील कन्हैय्या पतंग सेंटर, देशपांडे हाॅस्पिटल जवळील पतंग सेंटर, केडगाव येथील माऊली पतंग, एस पतंग येथे ...

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
पोलिसांनी शहरातील झेंडीगेट येथील कन्हैय्या पतंग सेंटर, देशपांडे हाॅस्पिटल जवळील पतंग सेंटर, केडगाव येथील माऊली पतंग, एस पतंग येथे छापा टाकून ७ हजार ९५० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला तसेच भोसले आखाडा येथील श्रद्धा जनरल पतंग सेंटर, गुगळे कॉलेज शेजारील वाघमारे पतंग सेंटर, कल्याण रोडवरील कृष्णा आर्ट पतंग सेंटर व शनिचौकातील लक्ष्मी कॉर्नर पतंग सेंटरवर छापा टाकून ५ हजार ३१० रुपयांचा नायलाॅन मांजा जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, भंगाळे, पोलीस नाईक रवींद्र टकले, गणेश धोत्रे, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, सुमित गवळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.