जनतेच्या कामाची दखल न घेतल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:59+5:302021-06-21T04:15:59+5:30
करंजी : तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जनतेची कामे न केल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास आपण गय करणार नाही. संबंधितांवर कारवाई करणार आहे, ...

जनतेच्या कामाची दखल न घेतल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
करंजी : तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जनतेची कामे न केल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास आपण गय करणार नाही. संबंधितांवर कारवाई करणार आहे, असा इशारा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
पाथर्डी तालुक्यातील शिराळ, वैजूबाभूळगाव येथे जनतेशी संवाद साधताना व तक्रारी ऐकताना घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी परिसरातील वीज, रेशन, फळबागांच्या विम्यासंदर्भात तक्रारी ऐकून तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून खडसावले. जनतेच्या कामाची दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांनी नवीन कृषी ऊर्जा धोरणानुसार योजनांचा फायदा घ्यावा. पीक विम्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची आपण लवकरच नगर येथे बैठक घेणार असल्याचे सांगून तनपुरे म्हणाले, वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, अमोल वाघ, भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, अशोक टेमकर, जालिंदर वामन, तहसीलदार शाम वाडकर, विस्तार अधिकारी शेळके, तलाठी पाटील, पुरवठा अधिकारी कुलकर्णी, महावितरणचे कनिष्ठ अभियंता मिश्रा, मंडळ कृषी अधिकारी पाटोळे, कृषी सहायक आव्हाड, ग्रामसेवक राजेंद्र साखरे, प्रतीक घोरपडे, साईनाथ गुंजाळ, शाम लोहकरे, भरत घोरपडे, रवींद्र घोरपडे, गणेश गुंजाळ, सरपंच रावसाहेब गुंजाळ, गीताराम झाडे, बाळू आठरे, डॉ. भरत घोरपडे, आदी उपस्थित होते.