नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:49+5:302021-07-05T04:14:49+5:30

अहमदनगर : वीकेंड लॉकडाऊनमध्ये नगर शहरात रविवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिल्ली गेट परिसरात नाकाबंदी ...

Action against drivers violating the rules | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई

अहमदनगर : वीकेंड लॉकडाऊनमध्ये नगर शहरात रविवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिल्ली गेट परिसरात नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. यावेळी मास्क न घालणाऱ्या एकासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९ जणांविरोधात कारवाई करत ८ हजार ३०० रुपयांचा दंड केला.

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने प्रशासनाने काही दिवसांच्या अनलॉकनंतर पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या काळातही बहुतांशी जण नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी पुन्हा कारवाईला प्रारंभ केला आहे. मास्क न घालणे, मोटारसायकलवर टिबल सीट जाणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

..............

फोटो ०४ कारवाई

नगर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली.

Web Title: Action against drivers violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.