एसटीतील २२ फुकट्यांवर कारवाई

By Admin | Updated: May 29, 2014 00:27 IST2014-05-28T23:43:44+5:302014-05-29T00:27:46+5:30

अहमदनगर : एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाने एप्रिल महिन्यांत केलेल्या तपासणीत २२ विना तिकीट प्रवास करणार्‍यांना पकडले आहे.

Action on 22 Futures in ST | एसटीतील २२ फुकट्यांवर कारवाई

एसटीतील २२ फुकट्यांवर कारवाई

अहमदनगर : एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाने एप्रिल महिन्यांत केलेल्या तपासणीत २२ विना तिकीट प्रवास करणार्‍यांना पकडले आहे. या फुकट्या प्रवाशांकडून २ हजार ८३८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती विभाग नियंत्रक यांच्याकडून देण्यात आली आहे. एसटीत विना तिकीट प्रवास करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक करावाई करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकाने विभागाच्या हद्दीत धावणार्‍या एसटी बसमधील प्रवाशांची तपासणी केली. यात २२ प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून २ हजार ८३८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नयेत, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on 22 Futures in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.