मुंगीत वाळू तस्करांची दीड कोटीची मालमत्ता जप्त
By Admin | Updated: January 17, 2016 23:41 IST2016-01-17T23:41:04+5:302016-01-17T23:41:51+5:30
शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाई

मुंगीत वाळू तस्करांची दीड कोटीची मालमत्ता जप्त
शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाईत सुमारे १ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये किमतीचे एक पोकलेन मशीन, ३ हायवा ट्रक, २ डंपर व १ ट्रक, अशी ६ वाहने, २९ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आली.
पथकप्रमुख मंडळाधिकारी अप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुख्यात वाळू तस्कर युनुस शेख व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगावचे तहसीलदार दादासाहेब गिते यांनी तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथक व पोलिसांसह शनिवारी पहाटे तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदी पात्रात छापा घातला. यावेळी वरील वाहने वाळूसह ताब्यात घेण्यात आली. यावेळी दोन ट्रक पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या परिसरातील वाळूचा कायदेशीर लिलाव झालेला नसताना वाळू माफिया युनुस शेख व इतरांनी गेल्या काही दिवसात २२ लाख ९५ हजार रुपये किमतीची ४२५ ब्रास वाळूची उचलेगिरी केल्याचीही पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत वरील सर्वांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला तसेच शासकीय महसुलाची हानी केली, याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोधेगाव दूरक्षेत्राचे हे. कॉ. तुकाराम काळे हे अधिक तपास करीत आहे.
(तालुका प्रतिनिधी)