दुचाकी पळविणा-या आरोपीस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:43 IST2018-06-29T15:43:22+5:302018-06-29T15:43:42+5:30
: एमआयडीसी परिसरातून मोटारसायकल पळवणाºया आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. एमआयडीसी येथून ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १६ बीआर ५१९३) ही मोटारसायकल चोरी गेली होती.

दुचाकी पळविणा-या आरोपीस पकडले
अहमदनगर : एमआयडीसी परिसरातून मोटारसायकल पळवणाºया आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
एमआयडीसी येथून ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १६ बीआर ५१९३) ही मोटारसायकल चोरी गेली होती. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेनेही (एलसीबी) या चोरीचा समांतर तपास सुरू केला.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी मच्छिंद्र नानासाहेब हारदे (रा. कानडगाव, ता. राहुरी) हा गुहा फाटा (ता राहुरी) येथे असल्याचे समजले. एलसीबीच्या पथकाने शिताफीने गुहा येथे जाऊन आरोपी हारदे यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.