चार तासात आरोपी पोलीस ठाण्यात शरण, म्हातार प्रिंपीत एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:52 IST2020-07-20T19:51:37+5:302020-07-20T19:52:59+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून नरेंद्र सर्जेराव वाबळे (वय ४५)याची राजेंद्र बबन शिरवळे याने कुºहाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास म्हातारपिंपरी शिवारात घडली.

चार तासात आरोपी पोलीस ठाण्यात शरण, म्हातार प्रिंपीत एकाची हत्या
श्रीगोंदा : तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून नरेंद्र सयाजी वाबळे (वय ४५)याची राजेंद्र बबन शिरवळे याने कुºहाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास म्हातारपिंपरी शिवारात घडली.
त्यानंतर हत्या करणारा राजेंद्र बबन शिरवळे हा स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. घटनास्थळास पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली. नरेंद्र वाबळेचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत, असा शिरवळे याला संशय होता. याच संशयातून ही हत्या झाली. उसाच्या शेतात असताना शिरवळे याने वाबळे याची हत्या केली.