सिव्हिलमधून साहित्याची चोरी करणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:58+5:302021-06-04T04:16:58+5:30
८ मे ते २९ मे या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील वेटिंग रूमचा दरवाजा तोडून त्यामधून ८१ हजार ११५ रुपये किमतीच्या ...

सिव्हिलमधून साहित्याची चोरी करणारा आरोपी जेरबंद
८ मे ते २९ मे या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील वेटिंग रूमचा दरवाजा तोडून त्यामधून ८१ हजार ११५ रुपये किमतीच्या आयसोलेशन वॉलचे साहित्य आरोपी लखन अनिल घोरपडे (रा. लालटाकी), मुरलीधर विश्वनाथ पाखरे (लालटाकी) यांनी चोरून नेले. याप्रकरणी रोशी कैलास काला यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्यातील आरोपी लखन घोरपडे हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेतला असता घोरपडे हा लालटाकी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येथे जाऊन लखन घोरपडे (वय २४) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीला गेलेल्या मालापैकी अंदाजे दहा हजार रुपये किमतीचे धातूचे दहा किलो पाईप त्याने काढून दिले. आरोपी घोरपडे याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.