पठाण खुनामधील आरोपी खरचंद जिल्हा रुग्णालयातून फरार
By Admin | Updated: April 2, 2017 12:41 IST2017-04-02T12:41:49+5:302017-04-02T12:41:49+5:30
पठाण खून प्रकरणातील आरोपी प्रविण खरचंद हा उपचारादरम्यान येथील जिल्हा रुग्णालयातून पसार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली़

पठाण खुनामधील आरोपी खरचंद जिल्हा रुग्णालयातून फरार
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २ - येथील गाजलेल्या अॅड़ रियाज पठाण खून प्रकरणातील आरोपी प्रविण खरचंद हा उपचारादरम्यान येथील जिल्हा रुग्णालयातून पसार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली़.
नेवासा येथील न्यायालयातील वकील रियाज पठाण यांच्या खुनाचा आरोप त्याच्यावर आहे. तहसील कार्यालयात अॅड. पठाण यांचा त्याने गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर तो स्वत:च नेवासा पोलीस ठाण्यात गावठी कट्ट्यासह शरण गेला होता. अॅड. पठाण खून खटला सध्या श्रीरामपूर येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. यापूर्वी याच गुन्ह्यातील आणखी एक आरोपी सोपान गाडे हा देखील पोलिसांच्या हातातून पळून गेलेला आहे.