बेकायदेशीररीत्या महिलेच्या घरात प्रवेश करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:13+5:302021-09-14T04:25:13+5:30
या घटनेतील फिर्यादी महिलेला आरोपीने वारंवार त्रास दिला होता. तसेच तिचे लग्न झाल्यानंतर आरोपीने तिला फोन करून तिच्या पतीस ...

बेकायदेशीररीत्या महिलेच्या घरात प्रवेश करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी
या घटनेतील फिर्यादी महिलेला आरोपीने वारंवार त्रास दिला होता. तसेच तिचे लग्न झाल्यानंतर आरोपीने तिला फोन करून तिच्या पतीस ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षाच्यावतीने या खटल्यात ॲड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. तसेच खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने फिर्यादी, फिर्यादीची आई, फिर्यादीचा मुलगा, फिर्याद घेणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती देवडकर यांचे जबाब नोंदविण्यात आले हेाते. दरम्यान, या खटल्यात फिर्यादी महिलाच फितूर झाली मात्र इतर साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस कलम ५०६ व कलम ४५२ प्रमाणे दोषी धरून शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खटल्यात ॲड. दिवाणे यांना पैरवी अधिकारी ठुबे यांनी मदत केली.