भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:01+5:302021-09-03T04:22:01+5:30

या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेनेही सुरू केला. स्थानिक ...

Accused of breaking the lock of the house all day and arrested | भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी जेरबंद

भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी जेरबंद

या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेनेही सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा कासार पिंपळगाव येथील राहुल पगारे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे समोर आले. पथकाने पगारे याचा कासार पिंपळगाव परिसरात शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही; परंतु पथकाने पगारेचे साथीदार चैतन्य बलभीम कांबळे (वय १९, रा. कासार पिंपळगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गुन्हा त्याने राहुल पगारे व आणखी दोन साथीदारांसह केला असल्याची माहिती दिली. त्यावरून आरोपींचा शोध घेतला असता एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ४ हजार रुपये किमतीचा मोबाइल व दोन गव्हाच्या गोण्या असा ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Accused of breaking the lock of the house all day and arrested