आरोपी व त्याचा भाऊ दया ऊर्फ बोंद्या नेटके यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी जुन्या भांडणाच्या कारणातून तात्या हरी खंडागळे (रा. लालटाकी) यांचा मुलगा प्रकाश तात्या खंडागळे यास धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी बोंद्या नेटके यास अटक केली होती. मात्र, दुसरा मुख्य आरोपी हरीश नेटके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी बोरुडे मळा परिसरात लपून बसला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथे छापा टाकला असता आरोपी हरीश नेटके (वय ३०, रा. लालटाकी) यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आरोपी हरीशविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात आधीचेच सहा गुन्हे दाखल आहेत.
खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST