तरुणीवर हल्ला करणारा आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST2020-12-26T04:17:11+5:302020-12-26T04:17:11+5:30

२४ डिसेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास दुचाकीवरून कामावर निघालेल्या तरूणीला अडवून आरोपी प्रवीण गवळी (रा. पारनेर) याने तिचा मोबाईल ...

Accused of attacking young woman absconding | तरुणीवर हल्ला करणारा आरोपी फरार

तरुणीवर हल्ला करणारा आरोपी फरार

२४ डिसेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास दुचाकीवरून कामावर निघालेल्या तरूणीला अडवून आरोपी प्रवीण गवळी (रा. पारनेर) याने तिचा मोबाईल मागितला. तो देण्यास नकार देताच त्याने तो हिसकावून घेतला व दोरीने तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणी व तिची मैत्रीण अशा दोघीजणी दुचाकीवरून कामावर जात असत. नेहमीप्रमाणे ती न आल्याने मैत्रीण तिच्या वडिलांबरोबर पीडित तरुणीच्या घराकडे गेली असता त्यांना रस्त्यात ही तरूणी जखमी अवस्थेत आढळली. त्यांनी त्वरित तिला रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी पिडितेचा जबाब नोंदवून आरोपी प्रवीण भिमाजी गवळी (वय २५, रा. पारनेर) याच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत.

Web Title: Accused of attacking young woman absconding