घरात दारुसाठा करणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:38+5:302020-12-13T04:35:38+5:30
वांबोरी येथील ब्राह्मणगल्लीत असलेल्या एका घरात हा दारूसाठा आढळून आला होती. ही दारू कुणी ठेवली होती, हे समोर आले ...

घरात दारुसाठा करणारा आरोपी जेरबंद
वांबोरी येथील ब्राह्मणगल्लीत असलेल्या एका घरात हा दारूसाठा आढळून आला होती. ही दारू कुणी ठेवली होती, हे समोर आले नव्हते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत कोपरगाव विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे यांनी आरोपींचा शोध घेतला तेव्हा ही दारु देवकर याची असल्याचे समोर आले. न्यायालयाने आरोपी देवकर याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी उपअधीक्षक संजय सराफ यांच्यासह निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक धवल गोलेकर, नंदकुमार परते, जवान नेहाल उके, भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, निहाल शेख व पांडुरंग गदादे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फोटो १२ दारू
ओळी - वांबोरी येथे उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून एका घरातून जप्त केलेली विदेशी दारू.